शबनम न्यूज , प्रतिनिधी : पुणे :
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महायुतीमध्ये जागा वाटपाचा तीढा अजून सुटलेला नाही, भाजप वतीने महाराष्ट्रातील 20 जागा वर उमेदवार जाहीर करण्यात आले परंतु महायुतीतील शिंदे गटाची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी वतीने अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. येत्या एक-दोन दिवसात महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर करण्यात येणार आहेत, याकरिता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार या तिघांची दिल्लीवारी सुरू आहे. महायुतीत मनसे पक्षालाही जागा मिळणार असल्याने महायुतीतील जागावाटपाकरिता उशीर होत असल्याचे बोलले जात आहे.
मावळ लोकसभा मतदार संघाविषयी अनेक चर्चांना उधाण आले आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात भाजप वतीने तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी वतीने आपल्या पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी मिळावी असा आग्रह धरला जात आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे देखील मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळण्यासाठी प्रचंड आग्रही आहेत , पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी वतीने मावळ लोकसभा मतदारसंघात माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्याकरिता उमेदवारी मागितली जात आहे. असे असतानाही मावळ मतदारसंघात महायुतीचा उमेदवार मीच असेल असे अनेकदा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी सांगितले आहे.
तसेच विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर जोपर्यंत विजय शिवतारे अजित पवार यांची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करणार नाही असाही इशारा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी वतीने देण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत महायुतीवतीने येत्या मंगळवारी शिंदे गटाचे शिवसेना पक्षाचे उमेदवार म्हणून खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची उमेदवारी जाहीर होणार आहे. युती धर्म म्हणून सर्वच महायुतीतील पक्षांना श्रीरंग आप्पा बारणे यांचे काम करावे लागणार परंतु सध्या महायुतीत तेढ निर्माण झाला आहे.