शबनम न्यूज , प्रतिनिधी :
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, आळंदी, डुडुळगाव या ठिकाणी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ आणि जगदंब प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १०/०८/२०२३ रोजी ठीक सकाळी १०.०० शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलामध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
चाकण ब्लड बँकच्या सहकार्याने आयोजित शिबिरात ६९ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर १५० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली . रक्तदात्यास जगदंब प्रतिष्ठान च्या वतीने सहा लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच देण्यात आले. रक्तदान शिबिराचे उदघाटक मा.श्री. वैभव विलासराव तांबे सचिव-श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांनी रक्तदान करण्यामागची भूमिका व महत्व अधोरेखित करीत रक्तदान हे सर्व दानापेक्षा सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन करून उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रक्तदान करण्याचे आवाहन करून शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी रक्तदानाची आवश्यकते याबाबत विवेचन करून सर्व रक्तदात्यास शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मा. श्री.राहुल कोल्हे, मा. श्री.अमित झोडगे, प्राचार्य डॉ. प्रमोद इंगळे, डॉ.प्रवीण भोई, डॉ. शांतीसागर भुजबळ, श्री.विजय केवडकर, श्री.यशवंत कांबळे, श्री.किशोर खरोसे, श्री.ऋतिक म्हेत्रे, श्री.अजय रोडगे यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष- मा.श्री. विशाल विलासराव तांबे, खजिनदार- मा.श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजीव कांबळे – रा. से. यो.कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. कैलास अस्तरकर – रा. से. यो कार्यक्रम अधिकारी यांनी मानले.
या कार्यक्रमाला प्रा. दीपाली ताम्हाणे – रा. से. यो कार्यक्रम अधिकारी, प्रा. शाहूराज येवते- विद्यार्थी विकास अधिकारी,कार्यालयीन अधीक्षक मा. श्री. प्रवीण भावे, तसेच सर्व विभाग प्रमुख,सहाय्यक प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती अशी माहिती प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.