पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवडमधील गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड आयडॉल २०२३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस गेली ७ वर्षे चांगला प्रतिसाद मिळाला व त्यातील काही स्पर्धकांनी ‘सूर नवा ध्यास नवा’,झी सारेगमप तसेच अशा अनेक स्पर्धांमध्ये गायक म्हणून पारितोषिक मिळविले आहे. या स्पर्धे मधील अनेक स्पर्धक व्यावसायिक रंगमंचावर गायक म्हणून नाव कमवीत आहेत.
दोन वर्षे कोव्हीड – १९ या जागतिक महामारी मुळे सदर स्पर्धेमध्ये खंड पडला होता. तो तेवढा कालावधी वगळता स्पर्धा सन २०१४ पासून अविरत सुरु आहे. पुन्हा एकदा नव्या दमाने आम्ही हि स्पर्धा आयोजित करीत आहोत. त्यामुळे नवोदित कलाकारांना उर्जा मिळणार आहे.
यंदाचे पिंपरी चिंचवड आयडॉल ‘मोरया करंडक’ चे हे ८ वे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे फॉर्म सर्व्हे नं.१६४ “मनिषा स्मृती निवास” भोईर नगर चिंचवड येथे उपलब्ध असून फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख बुधवार ०५ जुलै २०२३ (वेळ सकाळी १० ते सायं ५.०० वा.) आहे. स्पर्धेचा वयोगट १५ ते ३५ वर्षे असा आहे. अधिक माहितीसाठी ९२०९१९२३०४, ७२१९८३३८४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.