शबनम न्युज | मुंबई
राज्यातील राजकारणात रविवारी मोठा भूकंप झाला. शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील फूट झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीतील या फुटी नंतर शरद पवार सुद्धा मैदानात उतरले आहे. आज शरद पवार आणि अजित पवारांनी स्वतंत्र बैठका बोलावल्या असून, दोघांकडून आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. सत्ता संघर्षाच्या लढाईत महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रूपाली ठोंबरे पाटील देखील मुंबईत आल्या असून, त्यांनी अजित पवारांच्या गटातील बैठकीला हजेरी लावली आहे.
पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि महिला नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांच्या बैठकीला हजेरी लावली आहे. तसेच शरद पवार हेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. आम्ही आजही एकच आहोत. केवळ लोकहित आणि पक्षातील आमदार, पदाधिकाऱ्यांची कामे व्हावीत, या उद्देशाने अजित पवारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही अजित पवारांसोबत आहोत, असं यावेळी रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.