राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस कोणाबरोबर असेल शरद पवार की अजित पवार याचे उत्तर दोन दिवसापूर्वीच आपल्याला मिळाले होते पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी नेते हे अजित दादांच्या बरोबर असून आज अजित पवार यांची बैठक मुंबई येथील एम ए टी सेंटर येथे बोलविण्यात आली आहे या बैठकी करिता अजित पवार यांचे समर्थक संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईकडे रवाना झालेले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक आजी माजी नगरसेवक हे सर्व अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले आहे.
यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे भाऊसाहेब भोईर संजोग वाघेरे, राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे ,श्याम लांडे, राहुल भोसले, श्याम जगताप, बापू कातळे, संजय वाबळे, यश साने, शेखर काटे विशाल वाकडकर प्रसाद कोलते ,फझल शेख, प्रशांत सपकाळ , ईखलास सय्यद समीर मासुळकर ,प्रदीप आबा तापकीर, गंगा ताई धेंडे वर्षा गायकवाड, शितलताई हगवणे ,राजू बनसोडे तुषार कामटे , अक्षय माछरे, राहुल पवार यांचे सह अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून मुंबईकडे रवाना झाले आहेत.