शबनम न्यूज : पुणे (दि.३० डिसेंबर) :- केंद्र शासनाच्या शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या अटल रँकिंग ऑफइन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन अचिव्हमेंट २०२१ मध्ये भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश देशातील पहिल्या खासगी ५० महाविद्यालयांच्या यादीत झाला आहे.सलग दोन वर्ष पहिल्या पन्नासात मानांकन मिळविण्याचा बहुमान या महाविद्यालयाला मिळत आहे .
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .या रँकिंग प्रक्रियेमध्ये देशभरातील 1438 महाविद्यालय सहभागी झाली होती. शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रम,स्टार्ट अप, बौद्धिक स्वामित्व हक्क, नवोन्मेष ,नवसंकल्पना ( इनोव्हेशन ) अशा अनेक मुद्द्यांवर हे रँकिंग केले गेले. महाविद्यालयाने स्टार्टअप परीसंस्थेसाठी सतत घेतलेले परिश्रम, विविध उपक्रम, राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम मिळवलेले पेटंट आणि ग्रँट यामुळे हे मानांकन मिळणे शक्य झाले असे डॉ. आनंद भालेराव यांनी सांगितले.