बोगस मार्क्स बाबत तक्रार केल्याचा संशय घेवुन दलित महीला प्राध्यापिकेस नोकरीवरुन काढले
शबनम न्यूज : पुणे (दि.०५ जानेवारी) :- शिवाजी मराठी सोसायटीच्या समाजभूषण अप्पासाहेब जेधे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्राध्यापक महिलेस शासनाकडे तक्रार केल्याचा राग मनात धरुन नोकरीवरुन काढल्यामुळे संस्थेच्या चार संस्थाचलकांविरोधात विरोधात ॲट्रोसीटी कायद्यानुसार खडक पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेधे महाविदयालयातील ८०२ विद्यार्थ्यांना परिक्षा न घेताच बोगस गुण देण्यात आल्या प्रकरणी तसेच बेकायदेशीरपणे नियमबाह्य प्रभारी प्राचार्य नेमणुकी बाबत सामाजिक संघटनांनी केलेल्या तक्रारी नुसार महाविद्यालयाची राज्यसरकार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी सुरु केलेल्या चौकशी प्रकरणाच्या तक्रारी सदर प्राध्यापीकेने केल्याचा गैरसमज करुन व त्याचा राग मनात धरुन जातीय कारणातुन सदर महिला प्राध्यापक महिलेस कोणतेही अधिकार नसताना नोकरीवरुन विनाचौकशी तडकाफडकी काढल्या प्रकरणी शिवाजी मराठा संस्थेच्या १) सुनिल दरेकर २) डॉ. शोभा इंगवले ३) शेखर शिंदे व ४) संताजी जेधे यांचे विरुध्द ॲट्रोसीटी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचा पुढिल तपास फरासखाना विभागाची सहाय्यक पोलिस आयुक्त सतिष गोवेकर हे करत आहेत.