गजाला सय्यद
शाळा सुरु करण्याचा निर्णय सर्व घटकांशी चर्चा करूनच घेतला जाईल
शबनम न्यूज : पुणे (दि.२० जानेवारी) :- पुणे शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या हि वाढत चालली आहे. आणि यातच आता शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबद्दल माहिती दिली आहे.
शहरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय सर्व घटकांशी चर्चा करूनच घेतला जाणार आहे. असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील शाळा २४ जानेवारीपासून सुरू कराव्यात, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.तसेच त्या त्या ठिकाणची कोरोनाची स्थिती पाहता त्या स्थानिक पातळीवर तसा निर्णय घ्यावा, असेही राज्य सरकारने म्हंटले आहे. पुण्यातील मागच्या आठ ते दहा दिवसांची कोरोनाची स्थिती पाहता आणि तसेच गुरुवारी एका दिवसामध्ये शहरात सात हजाराच्या आसपास रुग्ण संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
तसेच पहिली ते बारावी या सर्व शाळा सुरू कराव्यात, असे राज्य सरकारने म्हटले आहे. आज मी स्वतः तज्ञांशी या विषयी बोललो त्यांचेही म्हणणे आहे की, पहिली ते दहावी च्या बाबतीत फेरविचार करावा, किंवा महापालिका म्हणून हा विचार करावा, कि पहिल्या लाटेत जर मुलं पॉझिटिव येत होती किंवा मुलांना सौम्य लक्षणे होती किंवा लक्षणे नव्हती. परंतु, आत्ताच्या लाटेमध्ये जे मुलं बाधित होत आहेत त्यांना ताप येतोय, थोडेसे तीव्र स्वरूपाची लक्षणे आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये थोडा हा विचार करायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे. असेही यावेळी महापौरांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले कि, या शनिवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्या बैठकीत याचा निर्णय घेऊ. तत्पूर्वी याच्यामध्ये विचार करताना शहरातील पालक, अनेक काही टास्क फोर्स मधील डॉक्टर असतील यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. शहरातील काही दिवसांपासून वाढती रुग्ण संख्या हा थोडासा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याशी आणि त्यांच्या सुरक्षिततेची प्राधान्य आमचं कायम राहणार आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. मागच्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये साधारणत: तीन हजार मुलं बाधित झाले. जवळपास शंभर मुलांना हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागलेत. आजही जी १ ते १८ वयोगटातील अशी ६४ मुलं रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आणि म्हणूनच कोरोनाची स्थिती, वाढता आकडा, आणि डॉक्टरांचे मत या सगळ्यांचा विचार करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. असेही महापौरांनी यावेळी सांगितले आहे.
शाळा सुरु करण्याचा निर्णय सर्व घटकांशी चर्चा करूनच घेतला जाईल ! pic.twitter.com/qodA4BbaPD
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 20, 2022