शबनम न्यूज : पुणे (दि.२२ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे युवा नेते बापू कातळे यांच्या दिनदर्शिकेचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले.अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. तसेच याप्रसंगी पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संदीप चिंचवडे व निलेश शिंदे, संदीप तरस आदी उपस्थित होते.
यावेळी बापू कातळे म्हणाले कि, अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करत आहे पण आज माझ्यासारख्या पदाधिकाऱ्यांच्या दिनदर्शिका प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. याचा मला सार्थ अभिमान आहे. असे मत यावेळी बापू कातळे यांनी व्यक्त केले.
Advertisement