शबनम न्यूज : पुणे (दि.२३ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत सपकाळ यांच्या दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले.अजित पवार हे शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, सामाजिक न्याय विभागाचे अभिजीत आल्हाट, सेवादलाचे विशाल घोगरे आदी उपस्थित होते.
तसेच यावेळी अजित पवार यांनी प्रशांत सपकाळ यांच्या दिनदर्शिकेचे निरीक्षण करून त्यांच्या सामाजिक कार्याची व उपक्रमांची प्रशंसा केली व असेच कार्य करण्यासंदर्भात सूचना तसेच मार्गदर्शन केले.
Advertisement