शबनम न्यूज : आळंदी (दि.२६ जानेवारी) : श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे येथे शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलात ७३ वा प्रजासत्ताक दिन संपन्न झाला.
यावेळी सौ. शितल पाटील – प्राचार्या आदित्य इंग्लिश स्कूल व प्रा. अतुल पानसरे -मुख्याध्यापक राजा शिवछत्रपती विद्यालय यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले. आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी ध्वजारोहण करून आपल्या मनोगतामध्ये भारत देशाने आपल्या साठी काय केले. यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो असा विचार प्रत्येकाने करावा तसेच देशभक्ती, देशसेवा, राष्ट्रनिष्ठा, सत्य व अहिंसा या महात्मा गांधीच्या तत्त्वांच्या पालनाची गरज व्यक्त करून प्रत्येक भारतीय नागरिकाने आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या कटाक्षाने पाळल्या पाहिजेत आणि ‘मानवी मूल्यांची जपणूक करण्यासाठी तयार करण्यात आलेली नियमावली’ म्हणजेच ‘भारतीय संविधान’ होय याचा सर्व भारतीयांनी आदर केला पाहिजे असे सविस्तर विवेचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सर्जेराव बरकडे यांनी केले तर डॉ. सुरेंद्र पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी मा. मयूर ढमाले खजिनदार – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ. प्रमोद इंगळे प्राचार्य – ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलातील शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, रामचंद्र पाटील औटी ज्युनियर कॉलेज, राजा शिवछत्रपती विद्यालय व आदित्य इंग्लिश स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.