शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ जानेवारी) :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1936 स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणारी अखिल भारतीय संस्था राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा यांच्या वतीने सन 2019 मध्ये राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली या परीक्षेमध्ये कुमारी गौतमी निकम ही विद्यार्थिनी भारतामध्ये सर्वप्रथम आली. त्यामुळे गौतमी हीचा सन्मान स्व.माजी सरपंच गोविंदराव तांबे चेरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शुभहस्ते तिला लॅपटॉप भेट देण्यात आला.
यावेळी प्रभागाच्या नगरसेविका महिला बालकल्याण सभापती सविताताई खुळे चिंचवडचे, प्रभारी संतोष कलाटे, नवीन लायगुडे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते गणेश नकाते, स्वीकृत प्रभाग सदस्य गोपाल माळेकर, स्वराज पतसंस्थेचे अध्यक्ष चेअरमन सुनील कुंजीर,अध्यक्ष देविदास आप्पा तांबे आणि ट्रस्ट चे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.