शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनधी
Advertisement
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आझमभाई पानसरे युवा मंच, आईबाबा प्रतिष्ठान, स्वीकृत नगरसेवक सुनिल कदम मित्र परिवार याच्या वतीने लालबहाद्दूर शास्त्री नगर येथे युवा नेते निहाल आझमभाई पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी सफाई कर्मचाऱ्यांना लागणारे सफाई साहित्य वाटप करण्यात आले.
Advertisement
Advertisement
कार्यक्रमाला फेहमिदा जावेद शेख , सामजिक कार्यकर्त्या मुमताज इनामदार, निर्मला माने व प्रभागातील नागरिक व महिला कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन स्वीकृत नगरसेवक सुनिल कदम मित्र परिवार याच्या वतीने करण्यात आले.
Advertisement
Advertisement