शबनम न्यूज / मावळ
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाले या सात वर्षाच्या यशस्वी वर्षाच्या निमित्ताने भाजप वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असताना मावळ पंचायत समिती सभापती निकिता नितीन घोटकुले तसेच गोधाम गोशाळा/गोधाम ईको व्हिलेजचे अध्यक्ष नितीन घोटकुले यांच्या वतीने ओवळे गावातील पोपट साठे ,दत्ता साठे, विमल भालेराव,सुमल भालेराव,अरूण भालेराव,सावित्रीबाई केदारी,उषाबाई साठे या गोरगरिब कूटुंबाना अन्नधान्य कीट , किराणा साहित्याचे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, तळेगांव चे नगरसेवक अरूण भेगडे,गोधाम ईको व्हिलेज अध्यक्ष नितीन घोटकुले,पवन मावळ भाजपा महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई साठे,ओवळे गावचे मा.उपसरपंच राहुल कराळे,मावळ भाजपा उपाध्यक्ष दशरथ साठे,मावळ भाजपा क्रीड़ा आघाडी अध्यक्ष राजुआप्पा कणसे,ओवळे भाजपा अध्यक्ष गणेश साठे,ओवळे भाजपा उपाध्यक्ष प्रविण साठे,ओवळे भाजपा सो.मि अध्यक्ष पै.अक्षयभाऊ भालेराव,ओवळे भाजपा युवा नेते-पै-महेशदादा साठे,चांदखेड गण भाजपा सो.मि अध्यक्ष-शिवभक्त अजित भाऊ शिंदे ,मा.चेअरमन – श्री.भागाभाऊ साठे,मा.तंटामुक्ति अध्यक्ष-रघुनाथभाऊ साठे,युवा नेते-अविनाशभाऊ साठे,मुर्दंगवादक-हभप गंगाराम चव्हाण ,तसेच इतर अनेक मान्यवर महिला व पदाधिकारी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधत ओवळे भाजपाचे युवा नेते पै.महेश साठे यांच्या 5 जुन रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.