शबनम न्यूज : आळंदी (दि.०३ फेब्रुवारी) :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, मानद सचिव मा. श्री. वैभव विलासराव तांबे यांना दैनिक सकाळ वृत्तपत्र समूहाकडून शैक्षणिक वर्ष २०२२ चा शैक्षणिक कार्याबद्दल ‘सकाळ एक्सलन्स अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रा. राजीव पाटील प्रशासकीय संचालक – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, प्राचार्य डॉ. हंसराज थोरात शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालय, प्राचार्य डॉ.प्रमोद इंगळे ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, प्राचार्या सौ.शितल पाटील आदित्य इंग्लिश स्कूल आणि मुख्याध्यापक प्रा. अतुल पानसरे राजा शिवछत्रपती विद्यालय यांनी मा. श्री. वैभव विलासराव तांबे यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन सकाळ वृत्त समूहाचे हार्दिक आभार मानले.
या सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या सत्कार समारंभासाठी शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलातील सर्व शाखेतील विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.