शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ फेब्रुवारी) :- कोइम्तूर येथे जुलै २०२२ मध्ये होणाऱ्या सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स आयोजित एरो डिझाइन चेलेंज स्पर्धेमध्ये पुण्यामधून पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचे विद्यार्थी टीम मावेरीक अंतर्गत सहभाग घेत असून, त्या अनुषंगाने सामाजिक उत्तरदायित्वाच्या यूटेक्स इंडस्ट्रीज नागपूर आणि अर्णव एन्टरप्राइसेस पिंपरी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध सुरक्षा साधनांची मदत करण्यात आली.
याप्रसंगी यूटेक्स इंडस्ट्रीज चे सिनियर मॅनेजर निशिकांत जढाळ , अर्णव एन्टरप्राइसेस चे एम. डी. सत्यजित जाधव, प्रवीण भिसे आणि टीम मावेरीक चे एम.डी. मिहीर झांबरे व इतर सहकारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना सुरक्षा साधनांची माहिती देऊन, सदर उपक्रमाला शुभेच्छा देण्यात आल्या.
Advertisement