शबनम न्यूज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, डुडुळगाव आणि आरोग्य विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालय आणि राजा शिवछत्रपती विद्यालयातील १५ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांकरीता covid-19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शालेय व महाविद्यालयीन एकूण १५१ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
या शिबिरासाठी मुख्याध्यापक प्रा. अतुल पानसरे राजा शिवछत्रपती विद्यालय, पर्यवेक्षक प्रा. सीमा साळुंके, रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. सुरेंद्र पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.या शिबिराला मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ आणि प्राचार्य डॉ. हंसराज थोरात रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालय यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमासाठी सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.