शबनम न्यूज – पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.श्री. नानासाहेब पटोले हे शनिवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२२ रोजी पिंपरी चिचंवड शहरातून दुचाकी फेरी द्वारे संचलन करणार आहेत.
सदर दुचाकी फेरी हि किवळे येथील मुकाई चौकातून ५ फेब्रुवारी रोजी शनिवारी दुपारी १ पासून सुरू होणार आहे.
फेरी मार्गः
मुकाई चौक – रावेत – वाल्हेकरवाडी – चाफेकर चौक – स्व. रामकृष्ण मोरे नाट्यगृह मार्गे – चिचंवड लोकमान्य पुल पार करून उजवी कडे – मोरवाडी चौकातून डावीकडे – सम्राट चौक कडून उजवी कडे – अजमेरा कॅालनी – वास्तू उद्योग चौक – झिरो बॅाईज चौक – नेहरूनगर सिग्नल – महेशनगर – संत तुकाराम नगर – वल्लभनगर – पुढे पुण्याकडे नाशिकफाटा मार्गे पुण्याकडे रवाना.
अत्यंत महत्वाचे म्हणजे वाहन चालवताना सर्वानी शिस्तीचे पालन करावयाचे आहे व पाच पाच जणांची ओळ करत फेरी यशस्वी करायची आहे.
वरिल कार्यक्रमादरम्यान शासनाने दिलेल्या कोविड साथरोग प्रतिबंधक सर्व उपाययोजना करतच फेरीचे संचलन करण्यात येणार आहे त्याच प्रमाणे वाहतूकीस कुठेही अडथळा होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे.
अशी माहिती पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी प्रसिद्धीपत्रकात मध्ये दिली आह