शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, आकुर्डी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तसेच आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाचे आधारस्तंभ अजित शितोळे यांच्यावतीने दत्तवाडी, आकुर्डी, गावठाण, गंगा नगर, प्रभाग क्र.२१ मध्ये महिला बचत गट व पुरुष यांना वाहन चालक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या परिसरातील पुरुष व महिलांना वाहन चालकाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. वाहन चालविण्यास आल्याने मनुष्य अधिक गतीने आपले काम करत असतो व सध्याच्या काळात गतिशील कामाला अधिक महत्त्व असते. याकरिता प्रत्येक महिला व पुरुष यांनी वाहन चालविणे हे शिकले पाहिजे. या उद्देशाने प्रत्येक महिला व पुरुष यांना मोफत वाहन चालक प्रशिक्षणाचे आयोजन शितोळे यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी अजित शितोळे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, अनेक सामाजिक उपक्रमात महिलांना आदराचे स्थान आहे. महिला सक्षमीकरण होत असल्याने अनेक व्यवसायात महिलांनी पुढाकार घेतला आहे. मात्र अनेक वेळा वाहन चालविण्यासाठी महिलांना अडचणीचा सामना करावा लागतो आणि या मुळे ते आपले कर्तव्य बजावण्यास कुठेही कमी पडू नये, याकरिता मी माझे कर्तव्य समजून माझ्या प्रभागातील प्रत्येक महिला वर्गासाठी मोफत वाहन प्रशिक्षण शिबिर सुरू केले आहे. आपल्या दत्तवाडी, आकुर्डी, गावठाण, गंगानगर भागातील महिला या उपक्रमात सहभागी होऊन या शिबीराचा लाभ घेतील असा विश्वास अजित शितोळे यांनी व्यक्त केला. तसेच सध्या वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी कमीत कमी तीन हजार रुपये खर्च करावा लागत आहे. मात्र या प्रशिक्षणासाठी येणारा खर्च सामाजिक कार्यकर्ते अजित शितोळे यांच्यामार्फत करण्यात येणार असल्याने महिलांना मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष आशा शिंदे. आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अण्णा कुराडे. आकुर्डी येथील सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा अजित शितोळे, जिनत इनामदार, तृप्ती निंबोळे, सुजाता घाडगे, तरशीला डेविड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष चौधरी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार अतुल शितोळे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करीम इनामदार आणि ननावरे काका यांनी परिश्रम घेतले.