शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील जाधववाडी परिसरातील ॲड विशाल जाधव यांच्या सुविधय पत्नी आणि महालक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्षा सौ शुभांगी विशाल जाधव यांच्यावतीने महिला बचत गटातील सर्व सभासद व जाधवाडी परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आनंदाने साजरा केला.
यानिमित्ताने महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ शुभांगी विशाल जाधव यांनी या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, महिलांना एकत्रित करून महिलांचे संघटन करून महिलांचे सक्षमीकरण करणे व अशा हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना एकत्र आणून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला असून भविष्यकाळात अनेक उपक्रम महिला सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने आपण करणार आहोत या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी केला. महिलांचा प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमास मिळाला. या निमित्ताने अनेक महिला एकत्र आल्या त्यांनी आपल्या अडीअडचणी एकमेकींना समजून सांगितल्या. तसेच सौ शुभांगी विशाल जाधव यांनी सर्व महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या व या अडचणी सोडविण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सौ शुभांगी विशाल जाधव यांनी सांगितले. तसेच या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे निमित्ताने अनेक महिलांना वाण देण्यात आले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे ऍड. विशाल जाधव व त्यांचे सहकारी कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले. हा कार्यक्रम महिलांच्या प्रचंड प्रतिसादाने यशस्वी झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि महिलांनी एकत्र आल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशस्वी केला. सर्व उपस्थितांचे यावेळी सौ शुभांगी विशाल जाधव यांनी आभार व्यक्त केले.