शबनम न्यूज | पुणे
शिवसेनाच्या युवती, युवासेना सुषमाताई अजित शेलार यांची भारतीय कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहर पुणे च्या अध्यक्षपदी निवड झाली. या वेळेस भारतीय कामगार संघटना चे साजिद भाई खान (महाराष्ट्र अध्यक्ष), शकील भाई खान (महाराष्ट्र उपाध्यक्ष), सविताताई पुजारी (महाराष्ट्र महिला अध्यक्ष), राजभाऊ कुसाळकर (पुणे जिल्हा अध्यक्ष) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
त्याच बरोबर मावळ तालुकेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे व माजी आमदार गौतम चाबुंकस्वार यांनी ही त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. आजतःगत पिंपरी चिंचवड शहर मध्ये शिवसेना पक्षाचे भारतीय कामगार सेना च्या अंतर्गत काम चाले होते. आता ऐनवेळी इलेक्शनच्या तोंडावर कंबर कसून पहिल्यादाच एका महिलेला भारतीय कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहरचे अध्यक्षपदी निवड करून एक नवीन इतिहास पिंपरी चिंचवड शहर मध्ये मांडला आहे. आता एक महिला कामगार क्षेत्रात आपली कामगिरी किती उत्तमरित्या पार पडतील हे त्याच्या भावी कामगिरीतून दिसून येईल. तरी त्याच्या भावी कामगिरी साठी सर्व शिवसेना पक्षा कडून शुभेच्छा.असे म्हणत खासदार श्रीरंग आप्पा बारणे व माजी आमदार गौतम चाबुंकस्वार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.