नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या दिव्यांग आधार आणि सुविधा केंद्राचे द्विवर्षपूर्ती पूर्ण
शबनम न्यूज : पुणे (दि.१३ फेब्रुवारी) :- पुणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या दिव्यांग आधार आणि सुविधा केंद्राच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित राहून शुभेच्छा देत नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच यावेळी दोन वर्षापूर्वी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या सहकार्याने दिव्यांग आधार केंद्र सुरू केले. त्याच्या उद्घाटनास मी उपस्थित होतो आज या केंद्राच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने पुन्हा येथे येण्याचा योग आला याचा आनंद आहेच आणि त्यापेक्षाही एखादा प्रकल्प किंवा उपक्रम हातात घेतल्यावर तो यशस्वीपणे चालविणे हे महत्वाचे असते. असे गौरवोदगार महापौर मोहोळ यांनी काढले.
दोन वर्षांच्या कालावधीत या केंद्रातून १५ हजार नागरिकांनी सेवेचा लाभ घेतला. ही नक्कीच समाधानकारक बाब आहे. असे हि यावेळी महापौर मोहोळ यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमांतर्गत केंद्रावर काम करणारे सूरज शिंदे, आशिष केदारी आणि अंकित कडू या कामगारांचा यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी दिव्यांग कलाकारांनी विविध वस्तू देऊन महापौर यांचा सत्कार केला. केंद्राच्या संचालिका श्रीजा ठाकूर आणि शैलाताई पटवर्धन यांनी केंद्राची माहिती दिली. यावेळी शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत सदस्य बापूसाहेब मेंगडे, ऍड. मिताली सावळे, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, प्रभाग सरचिटणीस निलेश गरुडकर, उदयोग आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विश्वजीत देशपांडे, शिरिष भुजबळ, उद्योग आघाडीचे सरचिटणीस रामदास गावडे, नारायण वायदंडे, प्रतीक खर्डेकर, हेमंत बोरकर, श्रीकांत गावडे, महिला मोर्चा उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ, आय टी सेलच्या संयोजिका कल्याणी खर्डेकर, माणिकताई दीक्षित,वैभव जमदाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच संदीप खर्डेकर यांनी या कार्यक्रमाचे स्वागत तर मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक आणि निलेश गरुडकर यांनी सूत्रसंचालन केले तसेच या कार्यक्रमाचे राजेंद्र येडे यांनी आभार प्रदर्शन केले.