शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ फेब्रुवारी) :- पिंपळे सौदागर येथील पी.के.चौक येथे सब वे बांधण्यात यावे, अशी मागणी मा.विरोधी पक्ष नेते, विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, ४५ मीटर वाकड ते नाशिक फाटा या बीआरटी मार्गावरील पिंपळे सौदागर पीके चौक येथे रस्त्यावर सध्या वाहनांची खूप वर्दळ वाढली आहे वारंवार येथे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याचा विचार करता गोविंद यशदा चौकाच्या धर्तीवर पी.के चौक येथील चौकामध्ये सब वे बांधण्यात यावा ही विनंती. सध्या पिंपळे सौदागर गावठाण कडून बीआरटी रस्ता ओलांडून जर्वरी रोड, कुणाल आयकॉन रोड, विश्वशांती कॉलोनी रस्त्याकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे. येथे पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व वाहन चालकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो, यामुळे येथे अपघातही होऊ शकतात. मा. आयुक्त महोदय आपणास विनंती की पिंपळे सौदागर मधील पी के चौकातील परिसरातील नागरिकांना सततच्या वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल विचार करता मधील ४५ मीटर वाकड ते नाशिक फाटा या बीआरटी मार्गावर येथील गोविंद यशदा चौकातील सब वेच्या धर्तीवर पी के चौकातही सब वे बांधण्यात यावा, असे हि सदर निवेदनात नगरसेवक नाना काटे यांनी नमूद केले आहे.