शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१८ फेब्रुवारी) :- नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्याच्या दृष्टीने माहिती संकलित करुन त्यांच्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आशा स्वयंसेविका उत्तम काम करीत असून आरोग्य सेवादूत म्हणून त्यांची सेवा वाखणण्यासारखी आहे, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
शासन मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आर.डी. आगा कम्युनिटी सेंटर, संभाजीनगर, आकुर्डी येथे आशा स्वयंसेविकांचे पाच दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षिस वितरण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, शासनाचे आरोग्य शिक्षणाधिकारी बापूराव गर्जे, पब्लिक हेल्थ नर्स शोभा ढोले यांच्यासह आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, गरोदर मातांकडे आशा स्वयंसेविकांनी काळजीपूर्वक लक्ष दिल्यामुळे सदृढ बालके जन्मास येण्यास मदत होत असते. त्यामुळे आशा स्वयंसेविकांची जबाबदारी महत्वपूर्ण आहे. समाजासाठी त्या काम करीत असतात. नागरिकांशी त्यांना निरंतर संवाद साधणे गरजेचे असते. अशावेळी विनयशील संवाद साधून विश्वास संपादन केल्यास नागरिकांच्या आरोग्याची सर्व माहिती प्राप्त करता येते. पर्यायाने त्यांना आरोग्य सेवा कशा पध्दतीने पुरवायची याचे नियोजन करता येते. महापालिकेने शहरात अद्यावत सुसज्ज रुग्णालये सुरु केली आहेत. यामध्ये आशा स्वयंसेविका सेवा देत आहे. शहराचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी आशा स्वयंसेविकांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूराव गर्जे यांनी केले. सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले तर आभार पब्लिक हेल्थ नर्स शोभा ढोले यांनी मानले.
आशा स्वयंसेविकांच्या प्रशिक्षण शिबिरात घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –
वक्तृत्व स्पर्धा– तन्वी पर्शराम(प्रथम), जागृती धुमाळ(द्वितीय), अश्विनी मखरे(तृतीय), उत्तेजनार्थ – संगिता सोनटक्के, संगिता कवळे, चंद्राबाई कांबळे, रेखा मस्के.चर्चासत्र स्पर्धा-आकुर्डी रुग्णालय (सुजाता गायकवाड, मिनाक्षी गायकवाड) प्रथम, यमुनानगर रुग्णालय(तन्वी पर्शराम, संगिता सोनटक्के) द्वितीय, तालेरा रुग्णालय (दिपाली नवगुणे, कल्पना गायकवाड) तृतीय, उत्तेजनार्थ – जिजामाता रुग्णालय (संगिता मोरे, शालिनी शिवचरण), थेरगाव रुग्णालय (अश्विनी मखरे, शिल्पा पात्रेकर), भोसरी रुग्णालय( गौरी गोळे, स्नेहल आहेर), सांगवी रुग्णालय ( वंदना मुंगेकर, निर्मला नवगुणे), वाय.सी.एम.एच ( अरुणा जोगदंड, महादेवी गायकवाड) पोस्टर स्पर्धा– कविता सोलंके(प्रथम), निता अदंगुले(द्वितीय), प्रिती रोडे(तृतीय), उत्तेजनार्थ – सोनम कांबळे, अरुणा शिंदे, निर्मला नवघुणे, खुशबु पठाण, सुवर्णा पवार. एकपात्री नाटक स्पर्धा–कल्पना गायकवाड(प्रथम), सरीता गायकवाड(द्वितीय), शिल्पा पात्रेकर(तृतीय), उत्तेजनार्थ – लक्ष्मी कांबळे, संजना गायकवाड, प्रमिला कांबळे, सुजाता गायकवाड, सुवर्णा काजळे.पोवाडा गायन स्पर्धा – सिमा सोनवणे(प्रथम), सारिका वरघर(द्वितीय), रेखा लोंदे(तृतीय), उत्तेजनार्थ – वैशाली सुर्यवंशी, मिनाक्षी थोरात,दिप्ती पवार, आशा उकंडे, रीना जगताप, वनिता पारेकर. निबंध स्पर्धा-प्रमिला पंडित(प्रथम), शितल चौधरी(द्वितीय), पुष्पा हिरवे(तृतीय), उत्तेजनार्थ – रोहिणी भेगडे, मेघा ओतारी, अर्चना बोरकर, रेश्मा वाघमारे, नैवशाद इनामदार.