शबनम न्यूज | पिंपरी
माळी महासंघ व माध्यमिक शिक्षक संघ(TDF) पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कस्पटे वस्ती शाळेच्या पदवीधर शिक्षिका सविता माने यांना सावित्री-जिजाऊ गौरव पुरस्कार देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या सभापती माधवी राजापुरे व राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या महिलांना सावित्री-जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सौ सविता माने या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ठोमसे गावचा रहिवासी असून सध्या शिक्षणं मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कस्पटे वस्ती शाळा येथे पदवीधर शिक्षिका म्हणून काम करीत आहे. तसेच सांगवीतील सातारा मित्र मंडळाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत सौ. माने यांचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम असून सातारा मित्र मंडळाच्या वतीने त्या सामाजिक कार्य करीत आहेत. याची दखल घेऊन माळी महासंघ व माध्यमिक शिक्षक परिषदेच्या वतीने त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.या पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी शिवाजीराव माने, अथर्व माने, इंदुबाई माने, पुष्पा गायकवाड, ओमकार झणझने,TDF चे कार्याध्यक्ष जी. के. थोरात, पुणे जिल्हा अध्यक्ष के. एस. डोमसे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष निवृत्ती काळभोर ,कार्याध्यक्ष महादेव फपाळ, माजी स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे, माझी महापौर अपर्णाताई डोके, शिवाजी कामठे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, हिरामण भुजबळ, अतुल क्षीरसागर, चेतन भुजबळ, सर्व महिला शिक्षक वृंद, माळी महासंघाचे पदाधिकारी, माध्यमिक शिक्षक संघ TDF चे पदाधिकारी उपस्थित होते महादेव फपाळ यांनी सूत्रसंचालन केले व शिवाजीराव माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.