शबनम न्यूज : पुणे (दि.२३ फेब्रुवारी) :- गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथे स्थापन करण्याबाबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले आहेत. कार्यालयासाठी सर्व सोईसुविधायुक्त खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त श्रीमती संगिता डावखर यांनी केले आहे.
पुणे शहरामध्ये गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे मुख्य कार्यालय तातडीने सुरू करण्यात येणार आहे. या कार्यालयासाठीच्या इमारतींमध्ये सुर्व सुविधा आवश्यक असून वीज, पाणी, शौचालय, बाथरुम आदी सुविधा आवश्यक आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे यांच्या शासकीय दरानुसार इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इच्छुक इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स.नं.104/105, विश्रांतवाडी रोड, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे (दूरध्वनी 020-29706611) येथे संपर्क साधावा.