शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.०१ मार्च ) :- महाशिवरात्रीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील जय जिजाऊ, जय सावित्री फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड. पूजा दीपक भोंडवे व सामाजिक कार्यकर्ते युवा सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख युवा नेते दीपक भोंडवे यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मधील वाल्हेकर वाडी, शिंदे वस्ती , चिंतामणी चौक, गुरुद्वारा, डी मार्ट, जिजामाता चौक या ठिकाणी एकूण दहा हजार नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच या महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना दीपक भोंडवे यांनी सांगितले की, महाशिवरात्रीनिमित्त नागरिकांना उपवास असतो या दिवशी अनेक धार्मिक विधी असतात यानिमित्ताने आपण या महाप्रसादाचे वाटप केले आहे.
Advertisement