शबनम न्यूज : पुणे ( दि.०२ मार्च ) :- पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेचा आणि सद्भावना यात्रेचा मंगळवारी सायंकाळी ४ वाजता गांधी पुतळा, पुणे स्टेशन येथे झाला.
महू (मध्य प्रदेश ) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन करणाऱ्या डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने नवी स्मारक समिती स्थापन करुन स्मारकाचे व्यवस्थापन सोपवल्याने ,संघ परिवाराचा कब्जा केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने स्मारक वाचविण्यासाठी पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रा 15फेब्रुवारी पासून काढण्यात आली होती.असलम इसाक बागवान यांनी यात्रेचे नेतृत्व केले.
संयुक्त संविधान बचावो कृती समिती,भीम जन्मभुमी बचावो कृती समिती,इनक्रेडिबल समाजसेवक गृप च्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .
अब्दुल बागवान, सादिक पानसरे, इबराहिम खान, विलास किरोते, संतोष म्हस्के, राजू सय्यद, सचिन आल्लाट, निखील जाधव, साहिल मणियार, शानू पठाण, गफूर सय्यद, रुषीकेश गायवाड, रियाज बागवान, व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
दिनांक 12/3/2022 ते 18/4/2022 पर्यंत “सदभावना ग्राम पंचायत राज मजबूती करीता पोचमपल्ली (तेलंगणा) ते वर्धा पर्यंत पदयात्रा इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान हे करणार आहेत.