शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ मार्च) :- प्रभाग क्रमांक 10 संभाजी नगर शाहूनगर, मोरवाडी यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये विकास कामांचा उच्चांक गाठला असून या सर्व विकास कामांनी चे उद्घाटन रविवारी 6 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड मनपाच्या शहर सुधारणा समितीच्या सभापती व प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी दिली आहे.
या प्रभागामध्ये भाजपचे तीन नगरसेवक आहेत, नगरसेविका अनुराधा गोरखे सह तुषार हिंगे व केशव घोळवे या सर्वांच्या सहकार्य व समन्वयाच्या माध्यमातून ही विकास कामे झाल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या रविवारी बर्ड व्हॅली मधील फाउंटन शो, केएसबी चौक येथील कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मारक, शिव शाहू शंभो उद्यान संभाजीनगर विरंगुळा केंद्र, मोरवाडी म्हाडा राजश्री शाहू उद्यान शाहूनगर, त्याचबरोबर चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद व क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्मारक सुशोभीकरण अशी अनेक कामे प्रभागात पार पडली असून या या सर्वांचे उद्घाटन मा. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
प्रभागात रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे, २४ बाय ७ पाणी पुरवठा व इतर सुविधाही गेल्या पाच वर्षात पार पडल्या, याच बरोबर मोरवाडी येथे दिव्यांगांसाठी प्रशिक्षण केंद्र तसेच केएसबी चौक येथे शाहू सृष्टी, संभाजी नगर बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय, मोरवाडी ऑटॉक्लस्टर येथील सायन्स पार्क अशी अनेक प्रभावी कामे गेल्या ५ वर्षात मार्गी लावली आहेत.
याचबरोबर दत्तनगर, विद्यानगर, लाल टोपी नगर या परिसरातही तेथे कमानी टाकने ,इंटरनल रोड, सीसी टी व्ही कॅमेरा बसविणे व सार्वजनिक स्वच्छतागृहे यासारखी कामे आम्हाला मार्गी लावता आली आहे. याचा आम्हाला अभिमान आहे .भाजपने शाश्वत विकास करून दाखविला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जनता आमच्या सोबत असेही त्या म्हणाल्या.