शबनम न्यूज : पुणे (दि.०६ मार्च) :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे महापालिकेत गेल्या नंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.