शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०८ मार्च) :- शहरातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांमुळे व नागरिकांमुळे महापालिकेच्या नावलौकिकात भर पडली असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या महिलांचा व नागरिकांचा सत्कार महापौर माई ढोरे यांच्या हस्ते महापौर दालनात करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. सत्कार प्रसंगी जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंडे, नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्या मनिषा पवार, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
सत्कारार्थीमध्ये महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या तसेच संगीत, कोरोना योद्धा, हिरकणी पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या स्मिता जोशी, संध्या ननवरे, मनिषा साळुंखे, बाळासाहेब साळुंखे, प्रणव कांबळे, दिपचंद भाट कॉसमॉस बँकेच्या असिस्ट॑ट जनरल मॅनेजर भावना देव, सामाजिक कार्यकर्त्या कविता तिटकारे यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.