शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०८ मार्च) :- जागतिक महिला दिन सर्वत्र महिलांचा सन्मान कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होत आहे पिंपरी चिंचवड शहरातही विविध ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम पार पडत आहे . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अ प्रभाग सदस्य सुनील कदम व त्यांच्या सौभाग्यवती प्राची सुनील कदम यांच्या वतीनेही या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महानगरपालिकेचे महिला सफाई कामगार तसेच डॉक्टर, शिक्षक, पोलीस अधीक्षक व पोलीस कर्मचारी व प्रभागातील कार्यक्षम महिला यांचा हा सन्मान मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी त्यांच्या प्रभागातील महिला बचत गटाच्या सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे नियोजन सौ. कुसुम कदम, सौ. वीरश्री कदम, सौ. सपना नायर, सौ निधी पुनमिया,सौ. मनीषा माने, सौ पुष्पा पाटील, मनीषा कर्डिले या महिलांनी केले.