शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ मार्च) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचालित चिखली येथे जगद्गुरू संतुकाराम महाराज संतपीठ २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये केंद्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई नियमानुसार शिक्षण दिले जाईल. भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
संतपीठाची स्थापना कंपनी कायदा २०१३ अधिनियम ८ अंतर्गत करण्यात आली आहे. संतपीठात नर्सरी ते पाचवीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. CBSE नुसार अभ्यास, प्रशासन, कार्यपद्धती, अभ्यास इंग्रजी माध्यमात केला जाईल. यामध्ये मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी आधी चौकशीसाठी अर्जाचे वाटप केले जाणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२२ ठेवण्यात आली आहे.
नर्सरी ते केजीपर्यंत प्रति विद्यार्थी २० हजार, पहिली ते तिसरीपर्यंत २७ हजार, चौथी ते पाचवीपर्यंत ३२ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. साहित्याचा इतर खर्च वेगळा असेल. नर्सरीसाठी ७० हजार, ज्युनिअर केजीपर्यंत ३० हजार, सिनियर केजीपर्यंत २७ हजार, पहिली ते ५ वीपर्यंत ४० हजार विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे.
भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी चिखली येथील संतपीठासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज संतपीठ जमिनीवर दिसू लागले आहे. अनेक आरोप-प्रत्यारोपही झाले. मात्र, महेश लांडगे यांनी त्याची पर्वा न करता सुंदर, अत्याधुनिक संतपीठ उभारण्यात अखेर यश मिळविले.