प्राधिकरणातील श्री जिव्हेश्वर सोसायटीत रंगला महिलांचा कौतुक सोहळा
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ मार्च) :- कुटुंबव्यवस्था हा आपल्याकडील महत्त्वाचा सामाजिक घटक आहे. स्त्रीमुळेच त्याचा डोलारा उभा आहे. चंगळवादी संस्कृतीमुळे या व्यवस्थेला धक्के जरूर बसत आहेत; परंतु आदर्शवादी स्त्रीमुळेच त्याची पाळेमुळे घट्ट आहेत. स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची दोन चाके आहेत; परंतु संसारथाचा तोल सावरला जातो, तो स्त्रीमुळेच. स्त्री म्हणजे त्यागाची मूर्ती, परमेश्वराचे रूपच. ती नसेल तर कुटुंब कोमेजते. रात्रंदिवस कष्ट करून कुटुंबाचा डोलारा सांभाळते; पण आपल्या मुलांबाळांना त्याची झळ पोहोचू देत नाही, अशा स्त्रीयांच्या पाठीवर नेहमीच कौतुकाची थाप देत तिचे कौतुक केले पाहिजे, असे मत माजी उपमहापौर तथा नगरसेविका सौ. शैलाजाताई मोरे यांनी व्यक्त केले.
“जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधत प्राधिकरणातील श्री जिव्हेश्वर सोसायटीतील महिला सदस्यांचा कौतुक सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन सौ. वर्षा विजय शेटे यांनी केले होते. कार्यक्रमास माजी उपमहापौर तथा नगरसेविका सौ. शैलाजाताई मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुरुषवर्गाने महिलांचे औक्षण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी खेळ, गायन, वक्तृव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभागातील विकासकामांची दखल घेत सोसायटीच्या वतीने रमेश गुरमाळे व मोहन साळी यांच्या हस्ते सौ शैलाजाताई मोरे यांच्या कार्याचा सन्मान करीत त्यांचा शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास वर्षा शेटे, आशा शेटे, विवा शेटे, गुरमाळे आजी, सविता गुरमाळे, कलावती साळी, शितल शिंपी, तेजश्री अष्टेकर, पल्लवी अंजिखाने, गीता ठोके, स्वाती तवले, सुषमा अष्टेकर, पुष्पा शिंपी, रजनी मारवाडी, सुलोचना ठोके, संध्या यादव, माधुरी काळे, मोहिनी जगताप, सेजल शिंपी, श्रावणी ठोके, नेहा अंजिखाने, रसिका अंजिखाने, सई शिंपी, प्राजक्ता ठोके, राजलक्ष्मी यादव, ओवी काळे आणि सोसायटीतील तीनही पिढ्या आणि समस्त पुरुष वर्गाने अतिशय आनंदात, उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली.