शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१० मार्च) :- पंजाब मध्ये आम आदमी पार्टीने विजय प्राप्त केले आहे. तसेच त्यांच्या या विजयानंतर संपूर्ण राज्यात आम आदमी पार्टी वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ते म्हणाले कि, आम आदमी पार्टीचा विजय हा सर्वसामान्यांचा विजय आहे. अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेल चा विजय आहे. आप च्या उमेदवारांनी पंजाब आणि गोवा मध्ये बड्या बड्या प्रस्थापित नेत्यांना पराभूत करून देशात सर्व सर्वसामान्यांचा विकासाचा पायंडा रचला आहे. आम आदमी पार्टी आता देशात प्रमुख विरोधी पक्ष आणि भाजप ला टक्कर देणारा पक्ष म्हणून समोर आला आहे. आम आदमी पार्टीच्या या विजयाने येणाऱ्या काळात जातीधर्माच्या मुद्द्यावरून शिक्षण, आरोग्यासारख्या मूलभूत मुद्द्यावर लढल्या जातील. असे ते यावेळी म्हणाले.
पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होत आहेत. आम आदमी पार्टीने ५४ जागांवर मुसंडी मारत काँग्रेस धक्का दिला आहे. आम आदमी पार्टी ८९, काँग्रेस १५, अकाली दल आणि आघाडी ८, रालोआ ४ जागांवर आघाडीवर आहेत. आम आदमी पार्टीने घवघवीत यश मिळत असल्याचे चित्र आहे. २०१७ विधानसभा निवडणुकीपेक्षा तब्बल ६९ जागावर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला ६२ जागांवर फटका बसला आहे. अकाली दलासही १५ जागा गमवाव्या लागतील, असे स्पष्ट होत आहे.