नोंदणी केलेल्या १६०० विद्यार्थ्यांमधून ६४२ युवक युवतींची निवड
शबनम न्यूज : पुणे (दि.१४ मार्च) :- अश्र्विनी महीला विकास संस्था, नगरसेविका सुजाता शेट्टी, मा. स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी आणि जॉब शो केस यांच्या माध्यमातून भव्य नौकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक १३ मार्च रोजी करण्यात आले होते. कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी पुणे शहरातील तरुण- तरुणींना विविध क्षेत्रातिल नामवंत कंपण्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळवूण देण्यासाठी सदानंद कृष्णा शेट्टी यांच मानस होता. याप्रसंगी
या नौकरी मेळाव्यात विविध क्षेत्रातील कंपन्या जसे की, Manufacturing, IT, Banking, BPO, KPO, Healthcare, Security, Facility, Hospitality, Real Estate, Automobile, Agriculture ई. सहभागी झाल्या होत्या. यामध्ये कमीत कमी ५ वी पास ते १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा ई. विविध शिक्षण घेतलेले तरुण – तरूणी सहभागी झाले होते.
युवक युवतींच्या मुलाखती – स्व. श्रीमती कृष्णा पद्मावती शेट्टी व्यापार व निवासी संकुल, सदा-आनंदनगर, 15 ऑगस्ट चौक, पुणे घेण्यात आल्या. नोंदणी केलेल्या १६०० विद्यार्थ्यांमधून ६४२ युवक युवतींची निवड करण्यात आली तर १५१ युवक युवतींना जाग्यावर नियुक्ती पत्र देण्यात आले. या नौकरी मेळाव्यात शहरातील तसेच शहरा बाहेरील युवक युवतींनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शिवली.