शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ मार्च ) :- शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने तळेगाव परिसरातील वृद्धाश्रम येथे मोठ्या प्रमाणात अन्नदान वाटप करण्यात येणार आहे. तसेच लहान मुलांसाठी व एक वर्ष ते दहा वर्षे वयोगटातील मुला मुलींसाठी मोफत नवीन आधार कार्ड नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. सुलभाताई उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना वतीने सदरचे सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत, अशी माहिती युवा सेनेचे भोसरी विधानसभा शहर प्रमुख अजिंक्य उबाळे यांनी दिली.
आधार कार्ड नोंदणी मोहिमेत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अजिंक्य उबाळे यांनी केले आहे.
Advertisement