शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.२५ मार्च ) :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्व. दत्ता काका साने प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर विद्यार्थी शहराध्यक्ष यश दत्ता (काका) साने यांच्या वतीने प्रभाग क्र. 13 ताम्हाणे वस्ती, म्हेत्रे वस्ती, मोरे वस्ती परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिर गुरुवार दि. 24 मार्च 2022 रोजी सकाळी दहा ते दोन यावेळेत अंगणवाडी चौक, शाळा क्र. 92 मोरे वस्ती, चिखली येथे संपन्न झाले. या शिबिरात मोफत औषधे, तपासणी, बीपी व मधुमेह तपासणी प्रथमोपचार करण्यात आले. या आयोग्य शिबीराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष कविताताई आल्हाट, विजय लोखंडे, शरद ताम्हाणे, काशिनाथ जगताप, गणेश साने तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.