शबनम न्यूज : पुणे (दि.०७ एप्रिल) :- मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस वाढत असतानाच वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे. राज ठाकरे यांची सही असलेला आदेश पक्षातर्फे जारी करण्यात आला आहे. मनसे माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे आता पुणे शहर प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक श्री. साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी श्री. साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/Egqw962ZIx
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 7, 2022
Advertisement