शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ एप्रिल) :- भगवान महावीर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. १४ एप्रिल) आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन साठे यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आले. महिला शहर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा गिरीजा कुदळे, पर्यावरण सेल अध्यक्ष अक्षय शहरकर तसेच मीना गायकवाड, इंद्रजित गोरे, देवानंद ढगे, सिद्धांत रिकीबे, मंगेश मोरे प्रकाश पवार, जीवन साखरे, युवक उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, दीपा गायकवाड, बाबा पाडाळे, मयूर जैस्वाल, मकर यादव, हिरामण गवई, राजेंद्र कोळी, विठ्ठल झोडगे, लायन्स क्लब पुणे आकुर्डी सदस्य उपस्थित होते.
Advertisement