शबनम न्युज | पिंपरी
किरकोळ भांडणाच्या कारणावरून एकाने घरात घुसून कुटुंबावर कोयत्याने वार केले, ही घटना 30 एप्रिल 2023 रोजी दुपारी 11:30 सुमारास मिलिंद नगर, पिंपरी, पुणे येथे घडली. या प्रकरणी प्रभाकर बाबुराव सोनवणे (वय 65, रा. मिलिंद नगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार करण ओहाळ (वय ३०, रा. मिलिंद नगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या जावई सोबत मिलिंद नगर येथे बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये गाडी काढण्याच्या कारणावरून आरोपी सोबत वाद झाला होता. तेव्हा आरोपीने फिर्यादी यांच्या जावईला स्टीलच्या कड्याने तोंडावर चार पाच बुक्क्या मारून जखमी केले होते. तेव्हा फिर्यादी आरोपीला पकडण्यासाठी गेले असता, आरोपीने तेथून पळ काढला. 30 एप्रिल रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या घरी, मुलगा व नातू सून यांच्यासोबत असताना आरोपी करण हा कोयता घेऊन आला व फिर्यादी यांना कोयत्याने डोक्यात मारहाण केली, त्यात फिर्यादी हे गंभीर जखमी झाले असून, फिर्यादी यांना वाचवण्यासाठी मुलगा व नातू आले असता, आरोपीने त्या दोघांनाही कोयत्याने मारून जखमी केले. तसेच बिल्डींग मधील शेजारी लोक जमा झाले असता, आरोपीने ‘कोणी मध्ये आला तर त्याला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात भा.द.वि. कलम 307 , 452 , 324 , 56 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहे.