शबनम न्युज | अकोला
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण, शानदार संचलन आणि विविध कर्तृत्ववानांचा झालेला सन्मान यामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला.
लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे मुख्य शासकीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व लगेचच ‘गर्जा महाराष्ट्र माझा…’ हे राज्यगीत पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर सादर करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष संगिताताई अढाऊ, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे सभापती श्रीमती आम्रपाली खंडारे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे, जिल्हा कामगार अधिकारी डॉ. राजू गुल्हाणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, महिला आर्थिक विकास महामंडळचे जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे, तसेच विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक परिवारातील सदस्य, शहिदांचे वारसदार, विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.