शबनम न्युज | हिंजवडी
कॅनडा येथे नोकरीला लावतो असे सांगत एकाने दोघांची सहा लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी मुकेश कुमार (रा. नांदेडसिटी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कार्तिक मोहपत चामट (वय २९, रा. बावडीरोड पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी व त्यांचे मित्र सुशांत जाधव (रा. सांगली) यांना कॅनडा येथे नोकरीला लावतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे मागितले, तारीख निघून गेली तरीही नोकरीला लावले नाही म्हणून फिर्यादी व सुशांत जाधव यांनी प्रोसेस कॅन्सल करण्यासाठी सांगितले असता, आरोपीने फिर्यादी यांना ५० हजार रुपये परत दिले, मात्र बाकीचे ६ लाखांची रक्कम परत न देता दोघांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात भा.द.वि. कलम ४०६, ४२०, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहे.