शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ एप्रिल) :- पहिल्या विश्व काव्यसंमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी स्थापन केलेल्या ‘काव्यसखी’ ह्या संस्थेच्या अध्यक्षपदी आघाडीच्या कवयित्री सौ.प्रतिमा अरुण काळे यांची नियुक्ती केली असल्याचे डाॅ.घाणेकर यांनी कळविले आहे.सचिवपदी,कवयित्री सौ.चंदन सुशील तरवडे,तर उपाध्यक्षपदी सौ.राजश्री संदीप वाणी यांची निवड करण्यात आली आहे.खास कवयित्रींसाठी च हे व्यासपीठ स्थापन करण्यात आले असल्याचे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी कळविले आहे.नवोदित कवयित्रींसाठी काव्यलेखन-काव्यवाचन स्पर्धा घेणे, विविध पातळीवर कवयित्री संमेलने घेणे, त्यांच्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहांना पुरस्कार प्रदान करणे,ज्येष्ठ कवयित्रीस काव्यसखी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करणे आदि विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.दिव्यांग,वंचित,ग्रामीण तसेच तळागाळापर्यंत ही काव्यचळवळ राबविली जाणार आहे.सौ.प्रतिमा अरुण काळे यांना अनेक राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले असून त्या साहित्यासाठी सातत्याने निरपेक्ष योगदान देत असल्याने त्या निश्चितच ‘काव्यसखी’चे काव्यजीवन अधिक समृद्ध करतील,असा विश्वास डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी प्रकट केला आहे.या व्यासपीठावरुन आपली कविता,लेख,साहित्य अधिकाधिक काव्य,साहित्य रसिंकापर्यंत पोहचावे अशा इच्छुक कवयित्रींनी अध्यक्षा सौ.प्रतिमा अरुण काळे यांच्याशी मो.नं.9405042938 वर संपर्क साधावा.
कवयित्री सौ.प्रतिमा काळे यांचा सविस्तर परिचय पुढील प्रमाणे :- जन्म दिनांक-२९ जुलै १९७९,शिक्षण – एम.ए,एम.एड्,बी.एड,डी.एड,डी.एस.एम,व्यवसाय-माध्यमिक शिक्षिका.रेडिओ एफ.एम.१०७.८ वर नव दुर्गा,कोरोना जनजागृती,गणपती उत्सव,कविता,चारोळी कार्यक्रम.हिरकणी पुरस्कार २०२१,पंढरपूर.प्रथमच लॉक डाऊन कालावधीत पाणी वाचवा विषयावर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन,परीक्षण केले ई. सी. ए.सोबत.ई. सी.ए.सोबत पर्यावरण संवर्धन,वृक्षारोपण,कोरोना जनजागृती.पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत संस्थेची महिला निरीक्षक.अनिसमध्ये पदार्पण केले.विविध ई-बुक प्रकाशित, विविध प्रातिनिधिक काव्य संग्रह प्रकाशित,तसेच स्वतःचे मी प्रतिमा माझी प्रतिमा हे,पहिले पुस्तक प्रकाशित,४/१२/२०२१ रोजी.न्याय प्रभात,मुंबई या मासिकाच्या कार्यकारी मंडळात सचिव पदी कार्यरत.महाराष्ट्र रजिस्टर रचियता समूहाची कमिटी सदस्य.जवळपास १००० पेक्षा जास्त प्रमाणपत्र.आतापर्यंत लेख,कथा,काव्य,निबंध यामध्ये विविध पारितोषिके,प्रशस्तीपत्रके.भजन सम्राट ह.भ.प.स्व.विठोबा अ.मरवडे सामाजिक प्रतिष्ठान,रायगड तर्फे -राज्य स्तरीय काव्य भूषण पुरस्कार सन -२०२०.भजन सम्राट ह.भ.प.स्व.विठोबा अ.मरवडे सामाजिक प्रतिष्ठान,रायगड तर्फे -राज्यस्तरीय समाजभूषण गौरव पुरस्कार सन -२०२०.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व बाबा ते बाबा अभियाना अंतर्गत राज्य स्तरीय लेख लेखन स्पर्धेत -विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन अधिक प्रभावीपणे कसा रुजवावा या विषय संदर्भात-चौथा क्रमांक.कोरोना काळानंतर आपले जीवन -निबंध स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक.डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार२०२१,धुळे.युनिव्हर्सल क्रिएशन संस्थेतर्फे प्रतिमा काळे यांना ‘होरायझन आंतरराष्ट्रीय पुरस्कार.फ्रेंड्स क्रिएशन संस्थेतर्फे सांस्कृतिक क्षेत्रात मौलिक योगदान केल्याबद्दल डॉ.सर मधुसदन घाणेकर सरांच्या शुभ हस्ते,friends International Award for glorious achivement in cultural fields हा पुरस्कार.पर्यावरण समिती अंतर्गत वृक्षारोपण,मराठी वृक्षांची जागरूकता.अँटी कोरोना टास्क अंतर्गत,गरजूंना मदत,मानसिक स्वास्थ बद्दल माहिती.पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रेम काव्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले.
मालिनी ग्रुप तर्फे स्त्रीयांसाठी मदत करणे, जन जागृती करणे,स्वयं रोजगार बाबत जागृती.पिंपरी चिंचवड मालिनी सिंगल मदर फोरम अध्यक्षपद.सामाजिक कार्य – काव्य लेखनातून,लिखाणातून ,स्री सन्मान बाबत जागृती.विधवा स्री बाबत मान मिळवून देण्यासाठी कार्य.युनिसेफ सोबत रेडिओ एफ.एम.१०७.८ वरून मानसिक स्वास्थ,कोरोना जनजागृती करणे, नवदुर्गा स्री बाबत माहिती देणे.