शबनम न्यूज : पुणे (दि.२२ एप्रिल २२ ) :- राज्यात कोळश्याचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागत असताना महाविकास आघाडी सरकार लोडशेडिंगच्या वाढत्या संकटावर मार्ग काढत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
यावेळी पवार म्हणाले की, लोडशेडिंगबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मुख्यमंत्री याबाबत दर आठवड्याला आढावा घेतील. राज्य सरकार वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे, पण राज्यात कोळशाचा तुटवडा आहे. ही समस्या मोठी असल्याने परदेशातून कोळसा आयात करणार आहे.
मंत्री नितीन राऊत, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी हे लोक देखील कोळसा उपलब्ध करण्याकरिता प्रयत्न करत आहेत . छत्तीसगडमधील कोळश्याची एक खाणचं महाविकास आघाडी सरकार ऊर्जा विभागासाठी घेण्याचा प्रयत्न असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील तश्या सूचना छत्तीसगडच्या काँग्रेसच्या सरकारला केल्या आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मला कोळश्याच्या पुरवठ्याबाबत कोणावर आरोप करायचे नाहीत. असेदेखील अजित पवार यांनी म्हटले आहे.