पिंपरी-चिंचवड – प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागाअंतर्गत दाट लोकवस्ती असलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये जिजाऊ क्लिनिक सुरु करत असलेबाबतची माहिती प्रियांका बारसे यांना वैद्यकीय विभागाकडुन मिळाली.
गवळीनगर मधिल सरकारी दवाखाना आरक्षण क्र.401 येथे सरकारी दवाखाना इमारत बांधण्यास परवानगी मिळणे साठी प्रियांका बारसे यांनी वारंवार आयुक्तांकडे यापुर्वी मागणी केलेली आहे. प्रभागात सरकारी क्लिनिक सुरू झाल्यास नागरिकांना जागेवरच प्राथमिक उपचार मिळाल्याने सरकारी दवाखान्यांवरील ताण कमी होईल.
रुग्णांना तपासणी व औषधे कमी दरात उपलब्ध होतील.गरिबांना लवकरात लवकर उपचार देणे शक्य होईल.आरक्षण क्रमांक 401 गवळीनगर या ठिकाणी जिजाऊ क्लीनिक झाल्यास 3-4 किलोमीटर परिसरातील नागरिकांना याचा उपयोग होईल
सरकारी दवाखाना सुरू होण्यासाठी आवश्यक ती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन शिफारस यापुर्वीच केलेली असल्याची माहीती बारसे यांनी आयुक्तांना दिली आहे.
गवळीनगर मध्ये जिजाऊ क्लीनिक सुरु करण्यासाठी प्राधान्याने विचार व्हावा अशी मागणी माजी नगरसेविका प्रियंका बारसे यांनी आयुक्तांकडे केली आहे.