शबनम न्युज | पिंपरी
बोपखेल, गणेशनगर कॅालनी नंबर १६ येथील रस्ता वर्षभरापुर्वी भूमीगत केबल्स टाकण्यासाठी व जलनिसारणच्या लाईन टाकण्यासाठी सदर रस्त्याची खोदाई करण्यात आली होती,हे काम पुर्ण होऊन सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी आजतागायत रस्ता त्याच खोदलेल्या अवस्थेत आहे.
खोदाई केलेल्या रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे घसरून अपघात होत आहेत, तसेच आता पुढील महिन्यात पावसाळा चालु होणार आहे, त्यामुळे चिखल होऊन धोकादायक परिस्थिती उदभवू शकते त्यामुळे लवकारात लवकर ह्या रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण करावे, असे निवेदन युवासेनेच्या प्रतिक्षा घुले यांच्या वतीने इ प्रभाग स्थापत्य विभागाचे अभियंता लक्ष्मण जाधव यांना देण्यात आले.
Advertisement
तसेच त्यांच्या मागणीची दखल घेत पुढील आठवड्यात रस्त्याचे काम पुर्णत्वास नेऊ अशी ग्वाही जाधव साहेब यांनी प्रतिक्षा घुले यांना दिली.