शबनम न्युज | पुणे
नव उद्योजकांना तसेच छोटया व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’ने २८ व २९ मे रोजी ‘कोथरूड शॉपिंग फेस्टिव्हल ‘ या महोत्सवाचे आयोजन केले आहे. गांधी भवन, कोथरूड येथे हा महोत्सव दोन्ही दिवशी सकाळी १० ते रात्री ८ या वेळात होणार आहे.
अभिनेते अजय पुरकर यांच्याहस्ते २८ मे रोजी सकाळी १० वाजता महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. या महोत्सवात खरेदीसाठी कपडे,पुस्तके,दागिने ,बॅग्ज ,फर्निचर ,कॉस्मेटिक्स अशी विविध दालने तसेच अनेक खेळ आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांचा समावेश असणार आहे. ‘विक्रेते आणि ग्राहक दोघांसाठी ही सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा‘, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनचे अध्यक्ष मनीष धोत्रे यांनी केले आहे.महोत्सवाच्या आयोजनातून मिळणारा निधी सामाजिक कार्याला देण्यात येणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने अनिकेत साळुंके,शशांक टिळक,दीपा पुजारी,प्रसाद पुजारी,पुष्कर मोकाशी,शशांक सप्रे,डॉ.ऋचा वझे-मोकाशी सांगितले.डॉ.ऋचा वझे-मोकाशी यांच्या संकल्पनेतून हा शॉपिंग फेस्टिव्हल होत आहे.