शबनम न्युज | मुंबई
मुंबईतील मुलुंड परिसरात शनिवारी एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या आईची हत्या करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. जयेश पांचाळ (वय. २२) असे आरोपीचे नाव असून, त्याने आपली आई छाया पांचाळ यांचा गळा चिरून समोरून येणाऱ्या ट्रेनमध्ये येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलुंड पोलिसांना तो रेल्वे स्टेशनवर जखमी अवस्थेत सापडला आणि उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल झाला.
मुलुंडच्या वसंत नगर भागात ही घटना घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. जयेशचे वडील औषध उत्पादक आहेत. कुटुंबात मालमत्तेचा काही वाद असल्याने गेल्या काही दिवसांपासून सतत भांडणे होत होती. अखेर भांडण झाल्यावर आरोपीने त्याच्या आईची हत्या केली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला,” असे अधिकारी पुढे म्हणाले.
Advertisement