शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
महापालिकेच्या रावेत शाळेत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थी – विद्यार्थिनीने रावेत गावठाणा “ज्ञानोबा तुकाराम ” “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हरी ” नामस्मरणासह शाळा ते गावातील विठ्ठल मंदिरापर्यंत विठ्ठलाच्या नाम -गजरामध्ये रावेत गावठाण दुमदुमून गेले. अनेक विद्यार्थी विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषा करून भजन करू लागले.
विठ्ठलाचे नामस्मरण करत पूर्ण गावभर दिंडी काढण्यात आली.त्यावेळी विठ्ठल रुक्माईचे व ग्रंथांचे पूजन करताना शाळेचे मुख्याध्यापक सुभाषराव सुपे सर ,साठे सर ,घुगे सर ,वीर सर , चारुशीला जाधव मॅडम , रूपाली कड मॅडम तसेच माध्यमिकचे इन्चार्ज रामेश्वर पवार सर तसेच रोकडे मॅडम व इतर सर्व स्टाफ आणि शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आनंदात दिंडीत सामील होऊन तब्येत गावातील विठ्ठल मंदिरात शिक्षकासह विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला.व विठ्ठलाच्या नामस्मरणात एकाग्र होऊन दिंडी सोहळा यशस्वी केला.